Monday, September 13, 2021

शिवपूर्वकालीन भारत -इतिहास

 

             शिवपूर्वकालीन भारत

1.रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1)आठव्या शतकातील -------------------

हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय.

 योग्य उत्तर: पाल 


2)राजपुतांपैकी चौहान घराण्यातील---------------

हा पराक्रमी राजा होता.

योग्य उत्तर: पृथ्वीराज चौहान


3)कर्नाटकातील ---------- घराणे प्रसिद्ध होते.  

 योग्य उत्तर: होयसळ घराणे


4)तामिळनाडूतील ---------- घराने प्रसिद्ध होता

 योग्य उत्तर: चोळ घराने 


5)महाराष्ट्रातील------------ घराना प्रसिद्ध होता

 योग्य उत्तर: राष्ट्रकूट घराणा 


6)राष्ट्रकूट घराण्यातील--------------------याने

अलाहाबादपर्यंतचे प्रदेश जिंकून  घेतले.

योग्य उत्तर: कृष्ण तिसरा


7)शिलाहारांची -----------घराणी पश्चिम

महाराष्ट्रात उदयास आली.

योग्य उत्तर: तीन घराणी


8)यादवांचा काळ हा----------- --------- आणि

-------- यांचा सुवर्णकाळच मानावा लागतो.

योग्य उत्तर:  मराठी भाषा आणि साहित्य


2.एका वाक्यात उत्तरे लिहा .


1)शिवपूर्वकालीन भारत म्हणजे काय?

योग्य उत्तर:  छत्रपती शिवाजी महाराजांनी

स्वराज्य स्थापन करण्या पूर्वीचा भारत म्हणजे

शिवपूर्वकालीन रतभा होय


2)गुर्जर प्रतीहार या सत्तेने कोठे कोठे

सत्ताविस्तार केली?

योग्य उत्तर: गुर्जर प्रतीहार या सत्तेने आंध्र,

कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनोज, गुजरात

पर्यंत सत्तेचा विस्तार केला. 


3)उत्तर भारतात कोणते घराने महत्वाची होत?

 योग्य उत्तर: उत्तर भारतात राजपूत घराणे

महत्वाची होत.



4)राजपूत घराण्यामध्ये कोण कोणते घराणे

महत्वाची होती?

 योग्य उत्तर: राजपूत घराण्यामध्ये गहाडवाल

घराने, परमार घराणे ही घराने महत्वाची होती.


5)तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान

याने कोणाचा पराभव केला?

योग्य उत्तर:तराई येथील पहिल्या युद्धात

पृथ्वीराज चौहान याने मुहम्मद घोरीचा पराभव

केला.


6)तराईच्या दुसऱ्या युद्धात कोणी कोणाचा

पराभव केला?

योग्य उत्तर: तराईच्या दुसऱ्या युद्धात

मुहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान याचा

पराभव केला.


7)तामिळनाडूतील चोळ घराण्यातील कोणते

राजे महत्त्वाचे होत? 

 योग्य उत्तर: तमिळनाडूतील चोळ घराण्यातील

राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे

महत्त्वाचे होत.


8)चोळांनी आरमाराच्या जोरावर काय जिंकले?

 योग्य उत्तर: चोळांनी आरमाराच्या जोरावर

मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून  घेतले.


9)कर्नाटकातील होयसळ घराण्यातील कोणत्या

राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला? 

योग्य उत्तर: कर्नाटकातील होयसळ

घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण

कर्नाटक जिंकला.


10)राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा

याच्या कारकीर्दीत राष्ट्रकूट सत्ता कोठे

पासून ते कोठे पर्यंत पसरली?

 योग्य उत्तर: राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद

तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता

कनोजपासून रामेश्‍वरपर्यंत पसरली.


11)शिलाहारांची तीन घराण्यापैकी पहिले

घराणे कोठे होते?

 योग्य उत्तर: उत्तर कोकणात ठाणे व

रायगड या जिल्ह्यात होते 


12) दुसरे घराने कोठे होते?

 योग्य उत्तर: दुसरे घराणे दक्षिण कोकणात

या जिल्ह्यात होते.


13) तिसरे घराणे कोठे होते?

 योग्य उत्तर: तिसरे घराणे कोल्हापूर,

सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्यात होते .


14)शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली

राजवट म्हणजे महाराष्ट्रातील कोणाची राजवट?

 योग्य उत्तर:  शिवपूर्व काळातील शेवटची

वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील

यादवांची राजवट होय.


15)यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची

राजधानी कोठे होती?

  योग्य उत्तर:  यादव घराण्यातील भिल्लम

पाचवा याची राजधानी औरंगाबादजवळील

देवगिरी येथे होती.


16)भिल्लम पाचवा यांनी सत्ताविस्तार

कोठे केली?

 योग्य उत्तर:  भिल्लम पाचवा यांनी कृष्णा

नदीच्या पलीकडे सत्ताविस्तार केली.


17)महाराष्ट्रात महानुभाव वारकरी संप्रदायाचा

उदय कोणत्या काळात झाला?

 योग्य उत्तर:  महाराष्ट्रात महानुभाव आणि

वारकरी संप्रदाय यांचा उदय यादवांच्या काळात

झाला.






No comments:

Post a Comment